थोडक्यात मनोगत ...

नमस्कार मित्रानो आणि मैत्रिनिनो , आज मी पांढरे डाग या सामाजिक विषायावर चर्चा करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी तसेच या विकारामुळे जगण्यात येणाऱ्या सामाजिक आडचानिंवर कशी मात करता येईल , यावर सखोल चर्चा करण्यासाठी या पेज ची निर्मिती करत आहे. या सामाजिक कार्यासाठी आपल्या बहुमूल्य सूचना आपण मला मार्गदर्शन करून पांढरे डागांनी पिडीत रुग्णाची जीवनातील वाटचाल सुखरूप होण्यासाठी मला नक्कीच मद्दत कराल मला खात्री आहे , मी तर फक्त एक वाटाड्या ( मार्गदर्शक ) म्हणून काम करणार आहे . गेल्या १२ वर्षांपासून आशा रुंग्नाचे उपचार माझ्याकडे चालू आहेत , आणि फरकही चांगल्या प्रकारे पडत आहे प्रत्येक रुग्णाच्या आडी-अडचणी मी जाणल्या आहेत, त्यांना समाजात वावरताना होणारा त्रास , लग्ने जमवताना होणारा त्रास , घरातील व्यक्ती ची समाजातून होणारी अवहेलना आणि बरेच सामाजिक प्रश्न , यावर आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी समजून मी या पेज ची निर्मिती करत आहे. आपले सर्वांचे सहकार्य आहेच आणि राहील याची मी खात्री बाळगतो . .......

Monday, April 9, 2012



                                               कोड , पांढरे दाग



होली है भाई होली है  बुरा ना मानो होली है ... होली  रंगोंका  त्योहार है ... अगर ये रंग ना हो तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया ...... हा  शोले मधील संवाद जीवनात खरंच कसा लागु पडतो नाही का ?
           खरंच रंगाचा आयुष्याशी कित्ती जवळचा संमध येतो काही उत्सव आसो वा वास्तविक जीवन खरंच  जीवनात रंगच नसेल तर जीवन अवघे बेरंगच होऊन जाते सारे  आयुष्य  नाही का  ?
             आयुष्याच्या वाटचालीत  रंगाचा आणि आपला 
पावालोगणित समंध येतो जसे की प्रत्येक कृती मध्ये विविध रंगाच्या
छट्टा उसळतात काही जाणवतात तर काही  अनुभवावे  लागते . पण त्याचे आस्तित्व आपल्याला जाणवत राहतेच ...
                तरुणपणी प्रेमात पडल्यावर गुलाबी रंग ,लहानपणी आभ्यास न् केल्याबद्दल गुरुजींनी गालावर उमठवलेल्या पाच बोटांचा लाल रंग, इच्छित हट्ट वडिलांनी पुरवल्यानंतर फुलणारे चेहऱ्या वरील हास्याचे रंग ,राग आल्यानंतर लाल बुंध होणारा चेहरा, अपमानाने  काळानिळा होणारा चेहरा , दुसऱ्याची प्रगती पाहून काळा  ठक्कर पडणारा चेहरा , दुखद प्रसंगी  डोळ्या समोर येणारा काळा  कुट्ट अंधार ...... इत्यादि .
      खरंच कित्ती रंगांचा व्याप्ती  आहे आपल्या  भावनिक , वैवाहिक, सामाजिक  जीवनामध्ये . रंग आणि आयुष्य यांचे जवळचे नाते आहे. खरंच रंगाशिवाय  जीवनात रंगच उरत नाही ना ?  रंग शिवाय आयुष्य खरंच  बेरंगच  होऊन जाते ,
           जेव्हा  आयुष्यातील रंग निघून जातो त्यावेळी मनुष्य मानसिक दुष्ट्या कित्ती  कित्ती हतबल होतो नाही  का ?  आज आपण आशाच एका शाररिक आजाराबद्दल चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये शरीरात आसनारी  रंग द्रव्ये हळू हळू कमी होत जातात आणि  त्यामध्ये  पांढरेपणा   दिसू लागतो   .......  आणि  खरंच आयुष्य बेरंग होऊ लागते होय ,  मी पांढरे दाग , कोड , leucoderma , vitiligo विषयीच बोलत आहे .
       गोऱ्या रंगाचे आकर्षण तर सर्वांनाच आसते , पण जेव्हा एखाद्या  व्यक्तीच्या चेहऱ्यावर  लहान मोठ्ठा पांढरादाग दिसू लागतो त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो , त्याचे वैगुण्य  त्याला दाखवतो ,कळत न् कळत आपण त्याला दुखावतो , खरे तर ती व्यक्ती आधीच  काळजीत आणि दुखात आसते पण आपण विचार न करता दुखावत आसतो ,तो पाहिलाच मनाने खचलेला आसतो आशा व्यक्तींना खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज आसते , पण आसे होत नाही  त्यांना  आधार देण्याऐवजी दुखावले जाते ही खेदाची बाब आहे, कृपा करून आसे करू नका ..
  मित्रांनो प्रत्येक माणसात काही ना काही  व्यंग , कमतरता असतेच काही दिसतात तर काही दिसत नाहीत , त्यामुळे आशा व्यक्तींना  जमले तर सहकार्य करा त्यांचे वैगुण्य दाखवुन त्यांना दुखवू नका ...
      जागतिक त्वचारोग तज्ञाच्या  समितीने कोड विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन आणि  जनजागृती करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणुन पाळावयाचे ठरवले आहे . या दिवशी विविध सामाजिक संघटना या दिवशी  विविध जनजागृती पर योजना कार्यक्रम राबवतात किबहुना त्याचे अविरत कार्यक्रम चालूच आसतात  . कोड. पांढरे दाग . leucoderma , vitiigo  या नावाने वैद्यकीय शास्त्रात संबोधले जाते तसा हा काही मोठ्ठा शाररिक आजार नाही पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे . विशेषतः मुलीमध्ये त्यातच  उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा  विवाह जुळण्यास फार मोठ्ठी आडचण आहे ,त्या शिवाय ज्या व्यक्तीना   पंढरेदाग कोड या आजाराने त्रास आहेत त्या समाजापासून दूर उपेक्षित राहतात. या लोकांमध्ये एकेल कोंडेपना  , शापित आयुष्य व्यतीत करतात .
             कोडावर, पांढरे डागांवर  कुठलेही औषधी नाही , हा दैवी कोप आहे वगैरे समजुतीही आपणाकडे रूढ आहेत .
           पांढरेदाग कोड .Leucoderma , Vitiligo  म्हणजे काय , तो  कसा होतो ,अनुवांशिक आहे का ?  यावर उपचार करायला हवेत इतके गंभीर  आजार  आहे का ? या आणि आशा अनेक नानाविध  प्रश्नानी रुग्न गोंधळला जातो काय करावे आणि काय नाही यातून  तो पूर्ण गोंधळला  जातो . आशावेळी रुग्नानाची कोंडी होते काय करावे हेच सुचत नही , अनेक उपचार करून ही फरक न झाल्यामुळे आगदी सुशीक्षीत रुग्ण सुद्धा अंधश्रधेला बळी पडतात  आणि शेवटी निराशाच वाट्याला  येते आणी शेवटी निराशाच पदरी पडते. ...

      या सर्व प्रश्नांची उक्कल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत
 या आणि आशा  अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आमच्या कडे आहेत आणि आम्ही ह्या लेखाच्या आधारे तुम्हाला देत आहोत.
                 हा लेख  तुम्हा;ला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल , तसेच रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणाम कारक  इलाज  कसे होऊ  शकतील. हे आपणास सांगेल .
     इतकच  नाही तर याचा हेतू आहे रुग्णांना  निरोगी कार्यशील जीवन जगता येणे शक्य आहे असा  विश्वास देण्याचा , तुम्ही पांढरे डागांवर सहज विजय मिळवू शकता , तुम्हाला वाटते त्याहूनही अधिक ते सोप्पे आहे ते ..
   टीप -- सकारात्मक  विचार करा पण त्याच बरोबर पांढरे दाग हा गंभीर आजार आहे. याची ही जाणीव ठेवा , त्यावर उपचार केलेच नाही किव्हा केलेले उपचार योग्य नसतील  तर ते  धोक्कादायक ठरू शकतो .

कोड विषयी समज गैर समज
++++++++++++++++++++
वैद्यकीय दृष्ट्या  कोड हा काही आजार नाही . कारण यापासून कुठलाही त्रास होत नाही किव्हा जीविताला  ही काही  धोका नाही तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे .पांढरेदाग असलेल्या मुला-मुलींचे लग्न होणे कित्ती आवघड आसते हे त्या कुटुंबाच ज्ञात आसते .त्या कुटुंबावर कलंक लावला जातो समाजात त्यांची आवहेलना केली जाते ज्या व्यक्तीला कोड आहे, त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे , आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला  आहे. या न्युनगंडात तों वावरत आसतो . किबहुना तो समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आसतो .त्याचा आत्मविश्वास  पूर्णपने धसाळलेला  आसतो.हे सर्व सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले तर समाज त्यांना मानवंदना देतो अशी अनेक उदाहरणे आहेत. उदा. मायकल  जाक्सन , भारताचा वीख्यात  क्रिकेट पट्टू  एकनाथ सोनकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला .
     भारतीय समाजात अनेक गैरसमजुती आहेत . समाजातील काही भोंदू बाबा , देवालाशी, मंत्रीक  तांत्रिक कोड आसलेल्या  लोकांना त्यांच्या नातेवाईकांना याबाबद वाट्टेल ते सांगतात , कुलदेवतेचा  किव्हा अन्यदेवाचा कोप ,त्यामुळे हे संकट कोसळल्याची भीती घालतात त्यामुळे अनेक धार्मिक विधी , उपवास , व्रत वैकल्ये , मंत्र तंत्र आणि धार्मिक विधी उपचारामुळे  कोड बरा होईल असा सल्लाही देतात त्यासाठी प्रचंड पैसा ही उकतात . काही झाडपाल्यावाले  वैदू , तुमडी , जळवा आदी अघोरी उपचार ही करतात तसेच काही झाड पाल्याची औषधी ही देतात याचाही काहीही उपयोग होत नाही . कोडवर योग्य वैद्यकीय उपचार करून घेणेच  योग्य आहे , ग्रामीण भागात तर कोडच्या , पांढरे डागाच्या बाबतीत खुपच गैरसमज  आहेत. यासाठी सामाजिक प्रबोधन फार महत्वाचे व गरजेचे आहे , प्रबोधन करून त्यांना सामान्य
जन-प्रवाहात आणणे गरजेचे आहे .कोड बाधित  व्यक्तींना  आपल्याला काहीतरी असाध्य आजार  झाला आहे असा मनोगंड आसतो, त्याचे  त्यांना योग्य शास्त्रीय मार्गदर्शन व कारण समजावून सांगून मनोगंड दूर करणे करणे इष्ट आहे .
         मुलींच्या  बाबतीत पांढरे डागांचा , कोडचा त्रास खूप जाणवतो आशा मुलींचे  विवाह जमने  खुपच आवघड जाते, काही वेळा तर पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचारही समाजात केला  जातो, आशा मुलींचे आयुष्यही बरबाद झाल्याची उदाहरणे  समाजात आहेत . बऱ्याच वेळा उतार  वयात ही लक्षणे दिसू लागतात परंतु योग्य उपचार घेते की हा असाध्य आजार असाध्य नाही .
     मंगळी मुलगी तशीच कोडची मुलगी  कुटुंबाला शाप  ? आसा  आक्रोश करूनही काही उपयोग नाही , मांत्रिक तांत्रिक कडे जाऊन ही काही फारसा  उपयोग नाही. ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्ती शापित आहेत किव्हा काही वेगळया आहेत असा  समज करून घेऊ नये ,या आजाराने शाररिक , बौद्धिक , मानसिक क्षमतेवर कुठलही परिणाम होत नाही. त्यांची बुद्धीमत्ता ही अन्य व्यक्तीप्रमानेच आसते . भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर  आजार आहे, हा गैरसमज आंध्रश्रद्धा रुढी परंपरेतून  कायम राहिली आहे.ही बाब दुर्दैवी बाब आहे. आगदी सुशीक्षित  माणसेही गंडेदोरे  आणी  अंगारा-धुपार्याचा  मार्ग या कोड निवारण्यासाठी स्वीकारतात हे मी पाहिले  आहे, हे  योग्य नाही कोड असणाऱ्या  व्यक्तींनी समाजात अनेक उतुंग यशाची शिखरे गाठली आहेत .हे लक्षात घेऊन आपण सर्वजन मिळून या कोडची कीड दूर करू या ....
         त्वचेवर  बऱ्याच प्रकारचे  पांढरट किव्हा पांढरे दाग  येतात सर्व पांढरे दाग म्हणजे कोड अथवा पांढरेदाग  आसू शकत नाहीत बऱ्याच वेळा अनेक आजारामध्ये जसे की पितीरीयासीस अल्बा
( pitiriasis Alba )  पोस्ट इंफ्लामेटरी (post inflamatory )             
 हय्पोपिग्मेंतातैओन ( hypopigmentation )  , ईदिओ पथिक हायपो पिग्मेंतातीओन ( Idiopathic Hypopigmentation ) भाजल्या नंतर जन्मजात , नँवस , पांढरे दाग यात समाविष्ट होतात . पांढरे दाग आहेत की बाकी काही याचे निदान तज्ञ डॉक्टर  कडूनच करून घेणे योग्य आहे .
कोड म्हणजे काय ?
===============
आगदी सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले  तर शरीरात असणारा रंग
कमी झाल्याने त्वचा पांढरी  दिसू लागते,यालाच पांढरे दाग म्हणतात
त्वचे मध्ये असणारया मेलानीन  नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणामुळे   शरीरास  काळा  , सावळा. निम गोरा , गोरा  रंग येतो . तो रंग तयार करणाऱ्या पेशी ज्यावेळी अकार्याक्षम  होतात, व्यवस्तीत कार्य करत नाहीत, आथवा नष्ट होऊ लागतात त्यावेळी त्वचा पांढरट होते आणि पांढरे दाग  दिसू लागतात .
 पांढऱ्या डागांचे विशेषतः प्रमाणानुसार चार प्रकार पडतात
======================================
१)    लोकालईझड – यामध्ये एकाच ठिकाणी दाग येतात आणि स्थिर असतात
२)    सेग मेंटल --  एका पट्ट्या मध्येच येतात .. दोन्ही बाजुं सारखेच असतात
३)    अक्रोफेसिअल – या मध्ये शारीरच्या  टोकाच्या भागाकडे हे दाग   असतात  म्हणजे  हाताच्या बोटांकडे, ओठांवर , तळहात , टाळ पाय  , आशा ठिकाणी आसतात
४)    जनरल --  पूर्ण शरीरावर  आसतात ..


कोडचे कारण
+++++++++

 एखाद्याला कोड का होतो हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे . कोडमध्ये जंतू  विषाणू नसतात. कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो ,हा काही दैव दैवतांचा  शाप नाही की भूतबाधा ही नाही...
याला  शास्त्रीय  कारण एवढेच सांगता येईल की मेलानीन हा रंग तयार करणाऱ्या मेलानोसाईट  पेशींच्या विरोधात एँनटी मेलानोसाईट प्रतीद्रव्ये तयार होतात  आणि ही प्रती द्रव्ये मेलानीन निष्क्रीय करतात  व मेलानीन तयार होत नाही ही प्रतीद्रव्ये का तयार होतात  हा संशोधनाचा विषय आहे .  आणि त्याविषयी जगभरात संशोधन चालू आहे
आपल्याच शरीराती काही पेशी आपलीच ओळख विसरतात आणि अनोळखी पेशींना नष्ट करण्याची प्रक्रिया चालू होते आनि तेथूनच हा आजार बळावतो ...
  गेल्या १४ वर्षांपासून मी या विषयावर आभ्यास करत आहे आणि बयाच श्या गोष्टी अनुभवातून समोर येत आहेत .
कोडावरील उपचाराचे यश अपयश
+++++++++++++++++++++++++
१)   एकाच घरात  दोन पेक्षा जास्त व्याकीनांना ही बाधा आसेल तर वेळ लागतो
२)   बऱ्याच वर्षांपासून जुनाट झालेल्या आजाराला वेळ आगतो
३)   पांढरे दगनावर काले केस असल्यास लवकर फरक पडतो
४)   अंगावर  जास्त प्रमाणात असल्यास वेळ लागतो
५)   वयाच्या ४०  वर्षांनतर उशिरा फरक पडतो
६)   उपचारासाठी काही महिने वर्ष हा कालावधी आतो त्यामुळे रुग्ण बरोबरच डॉक्टरांनी ही संयम  पाळणे हे गरजेचे आसते ...


  अधिक माहिती साठी आपण आकाशवाणी वरील हल्लो डॉक्टर, हा कार्यक्रम ऐकावा.
सामाजिक उपक्रम
+++++++++
आशा रुग्णांना  उपचार सोबतच योग्य वैद्यकीय मार्गदर्शन तसेच सल्ला , उपचार मिअने आवशक आहे .
आम्ही कै. शंकरराव पाटील सोनवणे वैद्यकीय सामाजिक प्रतीश्तन व आनंद हॉस्पिटल अन्ड रिसर्च सेंटर यांचुया विद्यमाने सुंदर मी होणार ही माहिती पूर्ण चित्र फीत २००३ साली प्रकाशित केली आहे , तसेच इंटरनेट वर त्या विषयी सुंदर मी होणार हे पेज तसेच www.cureleucoderma.blogspot.com तसेच  www.drsanjaypatil.blogspot.com या संकेत स्थळावर विस्तृत माहिती  दिली आहे ..
चला तर उपेक्षितांना आधार देऊन आपण ही म्हनु  या  ज्योत से ज्योत जगते ते चलो प्रेम की गंगा  बहाते चलो..... 
जग भरात लक्षावधी लोक या आजाराने व्यापेले आसून योग्य उपचारा अभावी यांची संख्या वाढत चालली आहे.
 होमिओपॅथिक उपचार पद्धतीने डॉक्टरांनी आतापर्यंत अनेक रुग्ण कायमचे बरे केले आसून अनेक रुग्णांचे  औषधोपचार चालू आहेत .

            डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा  गौरव म्हणून त्यांची दिल्लीत `` चिकित्सक रत्न ``या पुरस्कारासाठी  निवड २००४  साली झाली.
             तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने  २४ फेब २००५ रोजी  राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
                    त्याच प्रमाणे १७ सेप्ट . २००६  रोजी  शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ  अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले .
         त्याच प्रमाणे  युवा शक्ती  सामाजिक संस्था नासिक , यांचे वतीने २० में २००८ रोजी , उप् जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड ,आ. अनिल ढिकले,आदि.च्या उपस्थितीत नासिक येथे  समाज प्रबोधन २००८  पुरस्कार देण्यात आला .

 तसेच महाराष्ट्र  राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर . यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर.आर.पाटील साहेब यांचे हस्ते  कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .

   तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा , माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .

त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान  करण्यात आला आहे .  सदर कार्यक्रमास  मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) .  मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद )  ,
पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण  पत्रकार संघ .,महाराष्ट्र )
संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.































No comments:

Post a Comment